हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे आक्रमक नेते संजय गायकवाड यांनी कोरोनापासून संरक्षणासाठी मांसाहार करण्याचा सल्ला दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे हिंदुचा अवमान केल्याच्या प्रतिक्रिया वारकरी संप्रदायातून उमटू लागल्या. गायकवाड यांच्या विधानानंतर वारकरी आक्रमक झाले होते.
यावर प्रतिक्रिया देताना गायकवाड म्हणाले की, मी चुकीचे काही बोललेलो नाहीये. मी जे वक्तव्य केले त्यावर ठामच आहे. तसेच ‘बोलणारे हे वारकरी नाहीत तर भाजपचे वारकरी आघाडीतील चमचे आहेत’ अशी टीका त्यांनी केली. यावेळी गायकवाड यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. पंतप्रधानांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का? असा सवाल गायकवाड यांनी वारकऱ्यांना केलाय.
काय आहे प्रकरण –
बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, “आपल्या समर्थकांना कोरोनाशी झुंज देताना किमान अंडी आणि चिकन मटण खावं असं आवाहन केले होतं. यातून जीव वाचवण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता प्रोटीन मिळेल असं ते म्हणाले होते.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.