हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असताना राजकीय नेते देखील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना आवाहन केले. सध्याच्या प्रसंगी एकमेकांचे दोष काढणं योग्य नाही. सर्वांनी एकत्रं येऊन काम करावं. तरच संकटाला तोंड देता येईल. असे संजय राऊत यांनी म्हंटल. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले, सध्या सगळेच संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रसंगी एकमेकांचे दोष काढणं योग्य नाही. मुंबईसह राज्यातील कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. त्यामुळे राजकारण करण्याची गरज नाही. सर्वांनी एकत्रं येऊन काम करावं. तरच संकटाला तोंड देता येईल.
ते पुढे म्हणाले, सध्याच्या काळात राजकारण करणं योग्य नाही. राजकारण करण्याची आपली महाराष्ट्राची परंपरा नाही आणि सध्याच्या वातावरणात राजकारण करणंही योग्य नाही. महाविकास आघाडी संकट ही संधी मानून कधीच राजकारण करत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.