हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकिय वातावरण तापलं आहे. ईडीच्या कारवाई नंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यानी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही याबद्दल संताप व्यक्त केला आहे. “आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही. अटक करायची असेल तर अटक करा. नोटीस कसल्या पाठवत आहात. हिंमत असेल तर घरी या,” असं जाहीर आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे.
“प्रताप सरनाईक नसताना त्यांच्या घरी धाड टाकली आहे तो पुरुषार्थ नाही. भाजपाने सरळ लढाई गेली पाहिजे. शिखंडीसारखं ईडीचा, केंद्रीय सत्तेचा वापर करु नये,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी टीका केली आहे.काही झालं तरी आमचं हे सरकार, आमदार आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलीकडे जाऊन २५ वर्ष कायम राहील. एजन्सीचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छितात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. आता तर पुढील २५ वर्ष तुमचं सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे अस संजय राऊत यांनी म्हंटल आहे.
यापूर्वी छगन भुजबळ यांनीही भाजपवर साधला निशाणा
ईडी हे केंद्र सरकारच्या हातातलं बाहुलं झाल्याचं दिसतंय.ईडीची कारवाई ही ऑपरेशन लोटस चाच भाग असू शकत .विरोधकांची तोंड दाबण्यासाठीच भाजप कडुन संस्थानचा वापर होतोय अस मोठं विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं होतं. तसेच कोणतंही आणि कितीही दडपण आणलं गेलं तरीही एक लक्षात ठेवा, हे महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष आणि त्यापुढेही सुरळीत चालणार अस छगन भुजबळ यांनी म्हंटल आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’