हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर आहेत. तसेच कर्मचाऱ्यांकडून सरकार विरोधात आंदोलन सुरू आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप कडून एस टी कामगारांची माथी भडकवण्याचे काम सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलं.
शिवसेनेने कायम कामगारांच्या मागण्यांवर आस्था ठेवली. संपूर्ण कामगारांचे नेतृत्त्व शिवसेना महाराष्ट्रात करते. कामगारांच्या लढ्यातुनच महाराष्ट्र निर्माण झाला आणि शिवसेनेचा जन्म झाला, त्यामुळे आम्हाला हे तुम्ही शिकवण्याची गरज नाही असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील भूलथापांना बळी पडू नका असे सांगितलं असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटल
आज ज्या मागण्या एस टी कामगार करत आहेत त्याच मागण्या फडणवीस मुख्यमंत्री असताना देखील करण्यात आल्या होत्या, तेव्हा तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना हाकलून दिले होते असेही संजय राऊत यांनी म्हंटल कोरोना काळापासून राज्य सरकारवर आर्थिक बोजा आहे त्याबाबत राज्यातील मंत्री बोलतील पण शिवसेना कायम कामगारांच्या सोबत राहिली आहे असेही संजय राऊत यांनी म्हंटल