हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवार की अमित शाह, यांच्यापैकी अधिक भीती कुणाची?, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर संजय राऊत यांनी त्यांच्या बेधडक अंदाजात उत्तर दिलं…
भीती कशाला हवी कोणाची…? शरद पवार किंवा अमित शाह भीतीदायक आहेत, असं मला वाटतं नाही … एक आहे की त्यांच्या पक्षातल्या लोकांना त्यांची भीती आवश्यक आहे. शरद पवारांची भिती असण्याचं काही कारण नाही. त्यांच्याइतका लोकांमध्ये जाणारा लोकनेता मी पाहिला नाही, आज अनेक प्रसंगांत पवार साहेब स्वतः लोकांमध्ये जातात. तसेच कोणी जर पाप केलं असेल तर भीती वाटेल असं बेधडक उत्तर राऊत यांनी दिलं.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही लोक घाबरायचे. पण त्यांना भेटायचे तेव्हा त्यांच्या प्रेमात पडायचे. त्यामुळे पवार किंवा शाह यांना घाबरण्याचं तसं काही कारण नाही”, असं ते म्हणाले.
तसेच हे महाविकास आघाडीचे सरकार कधीही पडणार नाही असेही संजय राऊत यांनी ठामपणे सांगितल. भाजपचे दिल्लीतील नेते कधीही अस म्हणले नाहीत की हे सरकार पडेल आणि आता राज्यातील नेतेही अस बोलायचं बंद झालेत असही राऊत म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’