हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सामनातील लिखाणाबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप नोंदवला असून सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. माझ्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरत टीका करण्यात येते. ही भाषा तुम्हाला मान्य आहे का, हे विचारण्यासाठी मी सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे,’ असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावर आता शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘जर चंद्रकांत पाटील हे रश्मी ठाकरे यांना पत्र लिहीत असतील तर बाप रे ताबडतोब लगेच लिहा. भीती वाटते मला त्यांची ते पत्र लिहीत आहेत,’ असं म्हणत संजय राऊत यांनी उपरोधिक शब्दांत चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला आहे.
तसंच,ते आता ‘सामना वाचायला लागले चांगली गोष्ट आहे. कालपर्यंत वाचत नव्हते. आता सामना वाचत राहिले, तर त्यांच्या जीवनात भरपूर बदल होतील. सामना वाचत राहिले तर त्यांचा विश्वास बसेल की पुढच्या पाच वर्षांपर्यंत महाविकास आघाडीचं सरकार राहणार आहे,’ अशी टीका राऊतांनी केली आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा आहे आणि असायलाच हवी.जसा बाबर आमचा कोणी लागत नाही तसाच औरंगजेबही नाही,’ असं राऊत म्हणाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’