हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे.
गेल्या वर्षभरात मी पाहतोय, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, माझ्या नावाचा तुम्ही गजर करताय कालपासून यांना सातत्याने जे प्रमुख लोक आहेत, जे हे सरकार बनवण्यात आग्रही होते, राजकीय दृष्ट्या ते दबावाला बळी पडत नाहीत, तेव्हा हे असे नोटीस पाठवल्या जातात.. याला फ्रस्टेशन, हतबलता म्हणतात.. राजकारणात समोरासमोर लढण्याची धमक हवी.. छत्रपतींची भूमी आहे, समोरासमोर लढा अस खुलं आव्हानच त्यांनी भाजपला दिल आहे.
आमच्यासाठी ईडी हा महत्त्वाचा विषय नाही. एखाद्या गुन्ह्या संदर्भात सीबीआय, ईडी, आयकर विभागाने कारवाई करायची म्हटलं तर त्यामध्ये काहीतरी गांभीर्य आहे असं वाटत होतं. पण गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं, कारवाई करणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणं असं लोकांनी गृहित धरलं आहे. सत्तेतील राजकीय पक्षाला, केंद्रातल्या किंवा राजकीय विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही. त्यामुळे ईडी, सीबीआय सारखे हत्यारे वापरावी लागतात. असा आरोप राऊतांनी केला.
राऊत पुढे म्हणाले, कालच मी देवेंद्र फडणवीसांचं ऐतिहासिक विधान ऐकलं, काही केलं नसेल तर घाबरायचं कशाला? नोटीस म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहे का? मी परत सांगतो, आमच्यातील कुणी काहीही केलं नाही. नोटीस येऊद्या किंवा नाही येऊ द्या. आम्ही घाबरत नाही, तुम्ही घाबरायला हवं असा इशारा देखील संजय राऊतांनी दिला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’