भाजप कार्यकर्त्यांचे अस्तित्व रेव्ह पार्टीत, ईडी,आयटीत दिसते, ते कश्मीर खोऱ्यातही दिसावे

0
55
sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर निशाणा साधला आहे. सध्या भाजप सर्वत्रच दिसतोय. फक्त कश्मीर खोऱ्यांत निरपराध्यांच्या हत्या सुरु असताना केंद्र सरकार, भाजपचे अस्तित्व दिसत नाही. भाजप कार्यकर्त्यांचे अस्तित्व क्रूझवरील ‘रेव्ह’ पार्ट्यांत, जसे ईडी, आयटीत दिसते तसे ते कश्मीर खोऱ्यातही दिसावे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

इतर राज्यांत ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांचा वापर करून राजकीय विरोधकांच्या नाड्या आवळता येतात, पण कश्मीर खोऱ्यातील अतिरेक्यांच्या बाबतीत तेही करता येत नाही. भाजपचे लोक नशेखोरांना अमली पदार्थांच्या साठ्यासह पकडून देतात, ईडीला कारवाया पुढे रेटण्यात मदत करतात. एवढेच नव्हे, तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शांत करण्यासाठी खासगी आर्मी उभारावी असे जाहीर सल्लेही त्या पक्षाचे नेते आपल्या कार्यकर्त्यांना देतात,’ असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यापासून फुटीरतावाद्यांना जोर चढला आहे. अफगाणिस्तानातील तालिबानी सरकार हे पाकड्यांचे पाप आहे व त्यांच्या मदतीने कश्मीरवर चढाई करू, असे पाक पंतप्रधान इम्रान खान यांचे स्वप्न आहे. या स्वप्नाच्या चिंधड्या कशा उडविणार आहात ते सांगा. पोकळ भाषणे, आश्वासने व निवडणुकांच्या तोंडावरील ‘सर्जिकल स्ट्राईक’चे बहाणे करून कश्मीर वाचणार नाही व हिंदूंचे रक्षण होणार नाही. पुन्हा येथे नोटाबंदीचे सर्जिकल स्ट्राईक चालले नाही हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. असेही शिवसेनेने म्हंटल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here