हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल डिझेल दरवाढ म्हणजे धर्मसंकट आहे असं विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केल्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पेट्रोल-डिझेल धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका असा सल्ला राऊतांनी दिला आहे.
पेट्रोल-डिझेल धर्मसंकट वाटत असेल तर धर्माचे राजकारण करू नका. सत्ताही भाजपला श्रीरामाच्या नावावर म्हणजे धर्माच्या नावावर मिळाली आहे. राजकारणात धर्माला जास्त महत्त्व दिलं जात आहे, असं सांगतानाच लोकांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पेट्रोल- डिझेल दरवाढ करणं. या दरवाढीसंदर्भातील धर्मसंकट यूपीए सरकारवरही होतं. पण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग नेहमी संकटाचा सामना करायचे. तुम्ही तर पळ काढत आहात, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
रावणाच्या श्रीलंकेतही इंधन स्वस्त
देशातील जनतेचे महागाईपासून रक्षण करणं हे कुठल्याही सरकारचं काम आहे. व्यापारात फायदा होतो की तोटा हे बघायला सरकार बसलेलं नाही. आपण रामराज्यात राहतो. पण बाजूला असलेल्या सीता आणि रावण यांचा जन्म झालेल्या देशात म्हणजे नेपाळ आणि श्रीलंकेत पेट्रोल डिझेल स्वस्त आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची दरवाढ रामराज्यात वावरणाऱ्यांना शोभत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’