संजय राठोडांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही ; भाजप आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. त्यातच या प्रकरणी आता शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्ष भाजप अजून आक्रमक झाला असून भाजप कडून मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. जोपर्यंत संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री घेत नाहीत, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही असा पवित्रा भाजपने घेतला आहे.

आपला सुसंस्कृतपणाचा बुरखा टिकवण्याचा निलाजरा प्रयत्न सुरु आहे. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर एव्हढंच लॉजिक आहे. मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांच्या राजीनाम्याची वाट बघण्याची गरज नाही. ते कधीही मंत्रिमंडळातून हकालपट्टी करु शकतात. मात्र सुसंस्कृतपणाचा बुरखा कायम ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. पण जोपर्यंत संजय राठोड राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत भाजप अधिवेशन चालू देणार नाही, असं अतुल भातखळकर म्हणाले.

दरम्यान, सन 2021 अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि. 01 मार्च 2021 ते दिनांक 10 मार्च 2021 पर्यंत विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करून या अधिवेशनाचे नियोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 8 मार्च रोजी राज्याचा 2021-22 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like