हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्यातील वाघावरून जुंपलेली शाब्दिक चकमक अद्याप सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पुन्हा एकदा चंद्रकात पाटलांवर पलटवार केला आहे. वाघ हा वाघ असतो. त्याच्या मिशिला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहातोय मग बघू, असं म्हणत शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील यांचं मन लहानमुलासारखं आहे. ते निष्पाप, निष्कलंक आणि निष्कपट नेते आहेत. वाघाच्या मिशीला हात लावायलाही हिंमत लागते. या मी वाट पाहातोय, असं म्हटलं आहे.
तसेच राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटी संदर्भातील वावड्यांबाबत बोलताना संजय राऊत यांनी राज्यात शिवसेनेचाच ५ वर्ष मुख्यमंत्री राहिल. त्यात ना कोणता वाटा किंवा घाटा होणार नाही. तशी कमिटमेंटच सुरूवातीला दिली गेली आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.