हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 हुन अधिक समर्थक आमदारांसोबत बंडखोरी केल्यांनतर त्यांना आमदारकी वाचवण्यासाठी अन्य कोणत्या तरी पक्षात विलीणीकरण करावं लागण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावत शिंदे गट एमआयएम मध्येही विलीन होऊ शकतो असं म्हंटल आहे.
संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले, शिंदे गटातील बंडखोर आमदारकी वाचवण्यासाठी आता एमआयएम मध्येही जाऊ शकतात, ते समाजवादी पार्टीत जाऊ शकतात. तसेच ते मनसे मधेही जाऊ शकतात. बंडखोर आमदारांमुळे मनसेला जर मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर ती मोठी ऐतिहासिक गोष्ट ठरेल असेही राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आता काही लोक दाऊद वरून टीका करत आहेत. पण जेव्हा मेहबुबा मुफ्तींच्या सोबत भाजपने सरकार स्थापन केलं ते कस चालल?? असा सवाल करत दाऊदचं नंतर पाहून घेऊ. काश्मीरात काश्मिरी पंडितांची हत्या झालीय. भारतीय जवान मारले जात आहेत हे आधी पाहा असे संजय राऊत म्हणाले.