मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नीला रविवारी ईडीची नोटीस आल्याचे समोर आले. त्यानंतर राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली. त्यानंतर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर तोफ डागली आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडावं म्हणून आम्हाला धमकावलंही जातं आहे.. पण मी कुणालाही घाबरत नाही मी या सगळ्यांचा बाप आहे. मी जर तोंड उघडलं तर केंद्रात हादरे बसतील,असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.
कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, आम्ही लॉ मेकर आहोत, मी जर तोंड उघडलं तर केंद्रात हादरे बसतील, तुमची संपत्तीचे आकडे माझ्याकडे, तुमच्या मुलांचे हिशोब माझ्याकडे, मात्र उद्धव ठाकरेंचा आदेश, बाळासाहेबांची शिकवण, कुटुंबापर्यंत पोहोचायचं नाही, लढाई समोरासमोर करायची. “ईडीच्या नोटीचा आदर करतो, भले तो भाजपचा पोपट असो”, असं संजय राऊत म्हणाले.
भाजपाची माकडं कालपासून उड्या मारत आहेत. हे सरकार आम्हाला पाडायचं आहे. आमची यंत्रणा सज्ज आहे, तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका असंही सांगितलं जातं आहे. धमकावलंही जातं आहे.. पण मी कुणालाही घाबरत नाही मी या सगळ्यांचा बाप आहे असं म्हणत संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. . तुम्ही नोटीस पाठवा नाहितर आम्हाला घरी येऊन अटक करुन घेऊन जा. आम्ही घाबरत नाही. मात्र हे बायकांच्या पदराआडून केलेली खेळी तुमच्यावर पलटल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाना साधलाय.
आम्ही एक सर्वसामान्य कुटुंब आहोत. माझी बायको एक सामान्य शिक्षिका आहे. तिने घर खरेदी करण्यासाठी 50 लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र राजकिय षडयंत्रासाठी माझ्या पत्नीला ईडीची नोटिस बजावण्यात आली आहे असा आरोप राऊत यांनी केला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’