मुंबईचे महत्त्व राहू नये म्हणून भाजपने शिंदे नावाचा कळसूत्री बाहुला मुख्यमंत्रीपदी बसवला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपलय सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर घणाघात केला आहे. महाराष्ट्र आणि मुंबईचे महत्त्व राहू नये म्हणून भाजपने शिंदे नावाचा कळसूत्री बाहुला मुख्यमंत्रीपदी विराजमान केला असं शिवसेनेनं म्हंटल.

महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या पसंतीचे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. तरीही वेदांता- फॉक्सकॉन हा मोठा औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्रातून खेचून गुजरातला नेल्याचे वृत्त धक्कादायक आहे. पुण्याच्या तळेगावजवळ 1100 एकर जमीन व इतर सवलती या उद्योगास देण्याचे महाविकास आघाडी सरकारने मान्यच केले होते. हा प्रकल्प महाराष्ट्रातच होईल असे कंपनीचे पक्के वचन होते. जूनपर्यंत तरी कंपनीचे मन बदलले नव्हते, पण महाराष्ट्रात एक बेकायदा सरकार विराजमान होताच किमान 1 लाख लोकांना रोजगार देणारा हा प्रकल्प गुजरातला वळवला गेला आहे. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठवर हा खूप मोठा हल्ला आहे.

लूटमार पद्धतीने गुजरातने महाराष्ट्रातला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पळवून नेला आहे. या मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातने असेच पळवून नेले. आता फॉक्सकॉन हातचे गेले, फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला याचे खापर मुख्यमंत्री शिंदे यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकारवर फोडले काय तर म्हणे या प्रकल्पास दोन वर्षांत प्रतिसाद मिळाला नसेल. मग हे महाशय गेले दोनेक वर्षे त्याच सरकारचे महत्त्वाचे मंत्री होते. मग दोन वर्षे काय फक्त याची ओझी वाहण्यातच हे व्यस्त होते? असा सवाल शिवसेनेने केला.

श्री. फडणवीस यांनी त्यांच्या काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईतून उचलून गुजरातच्या हवाली केले तसे मुख्यमंत्री शिंदे यांनी फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या हातावर उदक सोडावे तसा सोडला. उद्या हे याच पद्धतीने मुंबईचादेखील सौदा केल्याशिवाय राहणार नाहीत. फॉक्सकॉन ही तर सुरुवात आहे.म्हद तुमच्या आमदारांना पाच-सहाशे खोके दिले. त्या बदल्यात मुंबई-महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या हाती द्या, असा हा सरळ सरळ सौदा दिसतो.

मनसेप्रमुख श्री. राज ठाकरे यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याबद्दल चिंता व्यक्त केली हे बरेच झाले; पण महाराष्ट्रावर आर्थिक हल्ला करणारे व येथील लाखभर तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे दुसरे-तिसरे कोणी नसून त्यांचे मित्र भाजपवालेच आहेत. महाराष्ट्राच्या प्रगतीची सर्व इंजिन व डबे ते गुजरातला वळवतील. हा धोका आताच लक्षात घेतला पाहिजे. मुंबई, महाराष्ट्राचे महत्त्व राहू नये यासाठीच भाजपने शिंदे नावाचा कळसूत्री बाहुला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान केला अशी टीका शिवसेनेने सामनातून केला.