हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वापर भाजप कॉण्ट्रक्ट किलर’ प्रमाणे शिवसेनेचा काटा काढण्यासाठी करून घेतोय असं म्हणत शिवसेनेने सामनातील रोखठोक सदरातून एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच शिंदे,अद्यापि वेळ गेलेली नाही! स्वतःला आवरता आले तर बघा असा सल्लाही दिला आहे.
श्री. शिंदे यांना शिवसेना फोडल्याचे इनाम म्हणून राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले. नारायण राणे व त्याआधी भुजबळांसारख्या नेत्यांनाही हा ‘लाभ’ झाला नाही, पण शिंदे यांनी राज्याचे नेतृत्व करण्याची व नेता म्हणून प्रतिष्ठा कमावण्याची संधी गमावली. आता असे दिसते की, भाजप त्यांचा वापर ‘कॉण्ट्रक्ट किलर’ प्रमाणे शिवसेनेचा काटा काढण्यासाठी करून घेतोय. हे लोकांना पसंत नाही. बीकेसीचा दसरा मेळावा व त्यात दीड तासाचे वाचून दाखवलेले भाषण यामुळे शिंद हे नेते नसून ‘कॉण्ट्रॅक्ट किलर’च्या भूमिकेत आहेत या भूमिकेवर ठसा उमटला. पुन्हा “माझीच शिवसेना खरी” व त्यासाठी भाजपची यंत्रणा हाताशी धरून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवली हा चीड आणणारा, हळहळ निर्माण करणारा विषय. शिंदे यांच्या अधःपतनाची ही सुरुवात आहे. असं शिवसेनेनं म्हंटल.
राजसाहेब, खरंच मराठीबद्दल प्रेम असेल ऋतुजा लटकेंना पाठिंबा द्या; कोणी केली मागणी?
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/9DhFuYidDU#hellomaharashtra @RPIsachinkharat
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 16, 2022
शिवसेना फोडल्यानंतर शिंदे हे खलनायक ठरले व लोक त्यांचा तिरस्कार करीत आहेत. हे कोणाचे अधपतन? मुख्यमंत्रीपद हे यश नसून लाचारी व गुलामी आहे. महाराष्ट्र ते पाहतोय. पुन्हा शिवसेनेला ‘मशाल’ चिन्ह मिळताच त्या मशालीस आव्हान देण्यासाठी समता पार्टीचे लोक शिवसेनेच्या विरोधात उभे केले गेले. गेल्या अनेक वर्षांत समता पार्टी व त्यांची मशाल कोठेच नव्हती. हे सर्व आर्थिक उलाढालीचे व खोक्यांचे प्रताप आहेत. व्यभिचारातून मिळालेल्या सत्तेचे मोल नसते व शिवसेना संपविणे याच ईषेतून काम करणारे महाराष्ट्रात टिकले नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे असं शिवसेनेने म्हंटल .
महाराष्ट्राची, मराठी माणसाची गरज म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. जन्मदात्यांशी व्यभिचार करून मिळालेले सुख फार टिकत नाही, असे हिंदू शास्त्र सांगते. अयोध्येतून आलेल्या संतमहंतांनी शिंदे यांना या शास्त्राची जाणीव करून देऊ नये, याचे आर्य वाटते!
शिवसेनेपासून दूर होऊन स्वतंत्रपणे काम करायला हरकत नव्हती, पण शिंदे यांना भाजपने कॉण्ट्रॅक्ट किलर म्हणून वापरले. अशा कॉण्ट्रक्ट किलर्सचा राजकीय अंतही वाईट होतो. महाराष्ट्राचा इतिहास व हिंदू धर्मशास्त्र हेच दर्शवते! अशा वेळी खोके निरुपयोगी ठरतात याची प्रचिती लवकरच येईल शिंदे, अद्यापि वेळ गेलेली नाही! स्वतःला आवरता आले तर बघा असा इशारा सामनातून देण्यात आला आहे.