Saturday, February 4, 2023

राजसाहेब, खरंच मराठीबद्दल प्रेम असेल ऋतुजा लटकेंना पाठिंबा द्या; कोणी केली मागणी?

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आम्हीच खरी शिवसेना असं सांगणाऱ्या शिंदे गटाने अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची हक्काची जागा भाजपसाठी सोडल्याने त्यांचे मराठी बद्दलचे प्रेम आता जनतेपुढे उघड झालं आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खरंच महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल प्रेम असेल तर त्यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना पाठिंबा द्यावा अशी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (खरात) अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे.

राज ठाकरे सतत म्हणतात कि माझा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मराठी माणसासाठी आहे. राज ठाकरे साहेब , खरंच आपलं महाराष्ट्र आणि मराठी माणसावर प्रेम असेल तर आता अंधेरी मध्ये मराठी महिला उमेदवार ऋतुजा लटके या उभ्या राहिल्या आहेत, आपण त्यांना तात्काळ समर्थन देऊन पाठिंबा द्यावा अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे. खरात यांच्या या मागणीवर मनसेकडून काय प्रत्युत्तर येत हे आता पाहावं लागेल.

- Advertisement -

दरम्यान, दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या अकाली निधनानंतर अंधेरी पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके याना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्याविरोधात भाजपकडून मुरजी पटेल निवडणुकीच्या रिंगणात आहे. लटके याना काँग्रेस राष्ट्रवादीची साथ मिळणार आहे तर पटेल याना शिंदे गटाचा पाठिंबा मिळेल. अंधेरी पूर्व मतदारसंघात मराठी मतेही मोठ्या प्रमाणात असल्याने मनसेची भूमिकाही महत्त्वाची मानली जात आहे. परंतु सध्या तरी मनसेचा कल हा भाजपकडे दिसून येतोय.