हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पालघरमध्ये साधूचे हत्याकांड जमावाने केले तेव्हा हिंदुत्व खतऱ्यात आले म्हणून सरकारवर हल्ले करणाऱ्या भाजपवाल्यांना वंदना बुधर व तिची जुळी मुले हिंदू वाटू नयेत व या हत्याकांडावर त्यांनी तोंड घडू नये, या ढोंगास काय म्हणावे? सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी 25 हजार 826 कोटी रुपयांच्या मागण्या सादर केल्या गेल्या. त्यात सार्वजनिक आरोग्य 2259, महिला व बाल विकास 1672, सामाजिक न्याय विकास सहाय्य 2673, आझादीचा अमृत महोत्सव 500 असे सर्व कोटीतले आकडे आहेत.असे असतानाही वंदना बुधरने आपली जुळी मुले गमावली आहेत. कारण या पैशांचा विनियोग जनतेसाठी नाही तर आमदार-खासदारांना खोकी देण्यासाठी सुरू आहे. खोकवाल्यांच्या सरकारने निष्पाप जिवांचे बळी घेतले. फडणवीस, आता कोणाचा राजीनामा मागणार? असा सव;ल शिवसेनेन आपल्या सामना अग्रलेखातून केला आहे.
ठाण्याजवळील मोखाडा तालुक्यात बोटोशी हे अतिदुर्गम गाव आहे. तेथील मरकट वाडीत वंदना बुधर या आदिवासी महिलेस जुळे झाले. बाळंतपणात काही अडचणी निर्माण झाल्या, पण गावात ना वाहन ना सरकारी आरोग्य केंद्र. उपचारांची आबाळ झाली. वंदनास प्रचंड रक्तस्राव सुरू झाल्याने मोखाडय़ातील डॉक्टरकडे नेण्याचे गावकऱ्यांनी ठरवले, पण दवाखान्यात नेण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही. त्यामुळे तिला ‘डोली’तून तीन किलोमीटर मुख्य रस्त्यावर आणले. तोपर्यंत वेळ निघून गेली. वंदनाची जुळी मुले त्या मुसळधार पावसात डोलीतच मृत झाली.
एका बाजूला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू होता आणि महाराष्ट्रातील आदिवासी पाडे अशा पारतंत्र्याच्या अंधारात आपल्याच आप्तांचे मृत्यू उघड्या डोळ्याने पाहत होते. हे झाले मोखाड्याचे प्रकरण. बाजूच्या वाडा तालुक्यातही तेच घडले. येथील पाचघर गावाला जाण्यासाठी मक्का सोडा, पण साधा रस्ता नाही. त्यात पावसाने ती पायवाटही नष्ट केली. 15 ऑगस्टला एका आदिवासी महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्या. गावात धावाधाव सुरू झाली. गावात एकमेव जीप गाडी होती ती बाहेर काढण्यात आली. पण रस्त्याचा साफ चिखल झाल्याने त्या जीपला दोन तास थक्के मारीत जीप मुख्य रस्त्यापर्यंत आणावी लागली. मोखाड्याप्रमाणे हा भागही शंभर टक्के आदिवासी लोकवस्तीचा आहे.
देशाला आदिवासी समाजाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या म्हणून आपण उत्सव साजरे केले. पण आदिवासी पाडयांवरील अंधार व छळवाद कायम आहे. मोखाडा, वाड्याचा, पालघरचा हा विषय कोणी तरी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूपर्यंत न्यायलाच हवा. इतक्या वर्षांत आम्ही आदिवासींना आरोग्य सेवा, रस्ता देऊ शकलो नाही. मेळघाट, धुळे, नंदुरबार हे दुर्गम भाग आहेतच, पण मोखाडा, पालघर, वाडा हे भाग तर ठाशातले, मुंबईजवळचे आहेत व गेली अनेक वर्षे विद्यमान मुख्यमंत्री या भागांत नेतृत्व करीत आहेत. ते कधी या रस्त्यांवरून गेल्याचे दिसत नाही. फडणवीस- शिंदे महाशयांनी समृद्धी महामार्ग निर्माण केला. पण आपल्याच ठाणे जिल्हयातील आदिवासी पाड्यांना ते रस्ता देऊ शकले नाहीत असं म्हणत शिवसेनेने फडणवीसांना टोला लगावला आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी 25 हजार 826 कोटी रुपयांच्या मागण्या सादर केल्या गेल्या. त्यात सार्वजनिक आरोग्य 2259, महिला व बाल विकास 1672, सामाजिक न्याय विकास सहाय्य 2673, आझादीचा अमृत महोत्सव 500 असे सर्व कोटीतले आकडे आहेत.असे असतानाही वंदना बुधरने आपली जुळी मुले गमावली आहेत. कारण या पैशांचा विनियोग जनतेसाठी नाही तर आमदार-खासदारांना खोकी देण्यासाठी सुरू आहे. खोकवाल्यांच्या सरकारने निष्पाप जिवांचे बळी घेतले. फडणवीस, आता कोणाचा राजीनामा मागणार? असा सव;ल शिवसेनेन आपल्या सामना अग्रलेखातून केला आहे.