हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूचा उद्रेक मोठया प्रमाणात होत असून लसी आणि ऑक्सिजन चा तुटवडा जाणवत आहे. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकावर जोरदार टीका केली आहे. परदेशातील लोकांना लस द्यायची आणि देशातील लोकांना मारायचा असा केंद्र सरकार धंदा आहे, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला आहे.
परदेशातील लोकांना आपलं काही तरी देणं-घेणं लागत म्हणून त्यांना लस द्यायची. मात्र आपल्या देशातील लोकांना मारायचं असा केंद्र सरकाराचा धंदा आहे. रेमडेसिव्हीर निर्यात ताबडतोब थांबवण्याची आवश्यकता होती. ती बऱ्याच दिवसानंतर थांबवली,” असे विनायक राऊत म्हणाले.
राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण वाढत असताना दुसरीकडे औषधांचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. तर दुसरीकडे रेमडेसिव्हीरचा पुरवठाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना याचा फटका बसत आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.