हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल करण्यात आला असून भाजपचे खासदार आणि आक्रमक नेते नारायण राणे यांना लघू आणि मध्यम उद्योग खात्याचं मंत्रिपद देण्यात आले. यावरून राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत असून त्यात आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी उडी मारत राणेंवर टीका केली आहे.
नारायण राणे सूक्ष्म खात्याचे मंत्री असोत किंवा त्यांना उद्या पंतप्रधान बनवलं तरीसुद्धा कोकणातून शिवसेनेला हटवणं हे कोणाच्याही ऐपतीमध्ये नाही. कोकण आणि शिवसेना हे अभेद्य नातं तोडण्याचं काम कोणीही करू शकत नाही’, असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दरम्यान, नारायण राणे यांनी आज आपल्या खात्याचा पदभार स्वीकारताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या का असा प्रश्न विचारला असता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एवढ्या मोठ्या मनाचा नाही असा टोला राणेंनी लगावला. तसेच खातं छोटं असो वा मोठं काम करणं महत्त्वाचे असते अस म्हणत त्यांनी संजय राऊतांना देखील प्रत्युत्तर दिले.