दुसऱ्यांना उखडता–उखडता एक दिवस तुम्हीच…..; शिवसेनेचा भाजपला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातील सरकार उखडून फेकण्याचं आवाहन केलं आहे.यानंतर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. दुसऱ्यांना उखडता–उखडता एक दिवस तुम्हीच मुळापासून उखडले जाणार नाहीत ना?, असा सवाल संजय राऊतांनी भाजप नेत्यांना दिला आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार उखडून फेका, असा फुसका बॉम्ब जे पी नड्डा यांनी फेकला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडण्याची भाषा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केलीच आहे म्हणून सांगायचे. अरुणाचल प्रदेशात 4-5 किलोमीटरपर्यंत घुसखोरी करून चीनने 100 घरांचे एक गावच वसवले आहे. चीनची ही सरळ सरळ घुसखोरीच आहे. हे गाव आधी उखडून फेका असे आव्हान राऊत यांनी दिले.

भाजपा हा आपल्या देशातील सगळ्यात जास्त निवडणूकग्रस्त पक्ष आहे. वर्षाचे ३६५ दिवस ते फक्त निवडणुकांचाच विचार करीत असतात. देशापुढे अनेक प्रश्न आहेत. त्यावर गांभीर्याने चर्चा झाली असती व पंतप्रधान मोदी यांनी त्यावर समारोपाचे मार्गदर्शन केले असते तर देशाला दिशादर्शक ठरले असते. कार्यकारिणीत ‘महागाई’वर कोणीच गांभीर्याने बोलले नाही. पेट्रोल-डिझेल आजही शंभरी पार आहे. गॅस सिलिंडर १००० च्या वर गेले आहे. भाजीपाला सामान्य जनतेस परवडण्यापलीकडे पोहोचला. खाद्यतेलाने १५० चा आकडा पार केला. यावर कार्यकारिणीतील कोणाचेच हृदय का जळले नाही?,” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केलाय.

Leave a Comment