व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शिवशाही बसची कंटेनरला धडक; पुण्यात भीषण अपघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. त्यातच आता पुण्यात शिवशाही बस आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. उरुळी देवाची हद्दीतील सासवड येथे हा अपघात झाला असून यात एकजण जागीच ठार झाला आहे तर ५ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सासवड रस्त्यावर उरुळी फाट्यावर असलेल्या गोडाऊनमधून कंटेनर माल भरून निघाला होता. मात्र त्याचवेळी पंढरपूर येथून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या शिवशाही एसटी बस जोरात होती. बस चालकाला चालकाला वेग नियंत्रित करता आला नाही. त्यामुळे बस कंटेनरला जाऊन जोरात धडकली.

या बसची धडक एवढ्या जोरात होती की बसचा पुढच्या भागचा चक्काचूर झाला आहे. याशिवाय कंटनेरचंही मोठं नुकसान झालं. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आणि पाच प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताने काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि बचावकार्य करण्यात आलं.