शोएब अख्तरला आता पाकिस्तानात सुट्टी नाही; भारताबाबत केले ‘हे’ मोठे विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । रावळ पिंडी एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेल्या माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये सध्या एक वादळ निर्माण होऊ शकते. काही कट्टरपंथी पाकिस्तानी लोकांना शोएब अख्तरचे भारताचा एजंट ठरवून पाकमध्ये त्याचे राहणे अवघड करू शकतात. याआधीही तो पाकिस्तानी हिंदू क्रिकेटपटू दानिश कनेरियाच्या दुर्लक्ष तसेच भेदभावाचा मुद्दा उपस्थित करून पाकिस्तानच्या मीडिया आणि कट्टरपंथीयांच्या संतापाचा बळी ठरला आहे.

वास्तविक शोएब अख्तरने जे म्हटले आहे त्याला बंडखोरी म्हटले जाऊ शकते, किमान आजच्या पाकिस्तानच्या वातावरणात तरी. आपल्याला पाकिस्तान सोडून भारतात स्थायिक व्हायचे आहे, असे शोएब अख्तरने नुकतेच म्हटले आहे. शोएब अख्तर म्हणाला की, जर तो अब्जाधीश झाला तर त्याला मुंबईत कायमस्वरूपी घर घ्यायचे आहे. अख्तरने असेही सांगितले की आपण भारतातून मिळवलेल्या पैशापैकी ३० टक्के रक्कम या देशात डोनेट करतो.

हॅलो एपवरील एका व्हिडिओ सेशन मध्ये अख्तर म्हणाला होता, ‘मी भारतातून जे कमावतो त्यातील ३० टक्के पैसे मी येथे डोनेट करतो. मी जर कधी अब्जाधीश झालो तर मला मुंबईत स्थायिक होणे आवडेल. २००५मध्ये जेव्हा काश्मीरमध्ये भूकंप झाला होता तेव्हा त्याने अनेक भारतीयांना पाठिंबा दर्शविला होता तसेच तो पाकिस्तानमधील हिंदूंनाही मदत करत असल्याचे सांगितले. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे दानिश कनेरिया आहे.

शोएब अख्तर म्हणाला की, सर्व धर्मांचे अनुसरण करणारे त्याच्यावर प्रेम करतात. तो म्हणाला, ‘मी आतून खूप मऊ आहे, परंतु बाहेरून माझी इमेज अशी आहे की मी खूप गंभीर आणि आक्रमक आहे. तो म्हणाला की त्याने शाहरुख खानबरोबर आपल्या चाहत्यांवर प्रेम कसे करावे हे शिकले आहे. अख्तर म्हणाला, ‘शाहरुख आपल्या चाहत्यांशी असा भेटतो कि जसा तो त्यांना वर्षानुवर्षे ओळखत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment