नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी कर्जदाता असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 1 जुलै 2021 पासून एटीएम व्यवहार (ATM Transactions) आणि चेक बुक जारी (Cheque Book Issuance) करण्यासाठी नवीन नियम लागू करीत आहे. त्याअंतर्गत, आता एका आर्थिक वर्षात बचत खातेधारकांना (Savin A/C holders) केवळ 10 पानांचे चेकबुक फ्री (Free Cheque Book) मिळेल. या आधारावर आता ग्राहकाला दरमहा 1 पेक्षा कमी म्हणजेच फक्त 0.83 चेक लीफ मिळेल. यानंतर, ग्राहकाला एका वर्षाच्या आत आणखी एक चेक बुक हवे असेल तर त्याला 10 पानांच्या चेक बुकसाठी 40 रुपये + GST द्यावे लागेल. त्याचबरोबर 25 पानांच्या चेक बुकसाठी 75 रुपये + GST द्यावे लागतील.
PNB, HDFC आणि ICICI बँक अधिक पाने देतात
SBI व्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि खासगी क्षेत्रातील एडीएफसी बँक (HDFC Bank) आणि आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) त्यांच्या आर्थिक वर्षात ग्राहकांना 25 पानांचे फ्री चेकबुक देते. जुलै 2020 पर्यंत SBI आपल्या ग्राहकांना 25 पानांचे चेकबुक फ्री देत असे. त्यानंतर त्यांची संख्या 10 पानांवर आणली गेली आहे. आता ग्राहकांना 10 फ्री पानांनंतर नवीन चेकबुक देण्यासाठी शुल्क भरावे लागेल. इतर मोठ्या बँकांमध्ये चेक बुक देण्यासंबंधी काय व्यवस्था आहे ते जाणून घ्या.
नवीन चेक बुकसाठी कोणती बँक शुल्क आकारते?
>> पंजाब नॅशनल बँक (PNB) वर्षामध्ये 25 पानांचे फ्री चेकबुक देते. त्यानंतर, डिजिटल माध्यमाद्वारे विनंतीनुसार ते प्रति पान 3 रुपये आणि शाखेत वैयक्तिकरित्या विनंती केल्यास प्रत्येक पानासाठी 4 रुपये शुल्क आकारते. त्याचबरोबर वैयक्तिक नसलेल्या विनंत्यांसाठी ते प्रति पानावर 5 रुपये आकारतात.
>> बँक ऑफ बडोदा मेट्रो आणि शहरी भागातील खातेधारकांना आर्थिक वर्षामध्ये 30 पानांचे फ्री चेकबुक देते. यानंतर नवीन चेक बुक देण्यासाठी प्रत्येक पानासाठी 4 रुपये शुल्क आकारले जाते.
>> एचडीएफसी बँक वर्षामध्ये 25 पानांचे फ्री चेकबुक देते. यानंतर, 25 पानांच्या अतिरिक्त चेक बुकसाठी 75 रुपये शुल्क आकारले जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी 1 मार्च 2021 पासून दरवर्षी 25 लीफ चेकबुक फ्री दिली जातात. यानंतर ते प्रत्येक पानासाठी 2 रुपये घेतात.
>> आयसीआयसीआय बँक आत्तापर्यंत 20 पानांचे फ्री चेकबुक देते. आता बँक त्यांची संख्या 1 ऑगस्ट 2021 पासून 25 पानांवर वाढवित आहे. यानंतर, चेकबुकच्या प्रत्येक 10 पानांसाठी बँक 20 रुपये घेते.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा