SBI च्या ग्राहकांना झटका; आजपासून घटले FD चे व्याजदर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या मुदत ठेवी (एफडी) चे व्याज दर कमी केले आहेत. एसबीआयने ३ वर्षांच्या कालावधीतील एफडी वर ०.२० टक्के व्याज दर कमी केलेले आहेत. आजपासूनच नवीन दर लागू झाले आहेत. तथापि, बँकेने एफडी व्याज दर ३ वर्षे ते १० वर्षे असलेल्या एफडीचे व्याजदर बदललेले नाहीत. बँकेने नुकतेच एक निवेदन जारी केले त्यात त्यांनी असे म्हंटले आहे की’ सिस्टम आणि बँकेची तरलता लक्षात घेऊन आम्ही ३ वर्षांच्या कालावधीसाठी रिटेल टर्म डिपॉजिट्स रेट च्या दरात कपात करीत आहोत.

एसबीआय एफडी दरांचे नवीन दर
१२ मेपासून एबीआयच्या निश्चित ठेवीवरील नवीन व्याजदर असे असतील,७ ते ४५ दिवसांनी मिळणारे एफडी व्याज हे ३.३ टक्के असेल. त्याचबरोबर ४६ ते १७९ दिवसांच्या एफडीवर ४.३ टक्के आणि १८० ते २१० दिवसांच्या एफडीवर ४.८ टक्के व्याज दर असेल. याशिवाय २११ दिवस ते १ वर्षाच्या कालावधीपर्यंत एफडीवर ८.८ टक्के , १ ते २ वर्षासाठी ५.५ टक्के आणि २ ते ५ वर्षांसाठी ५.५ टक्के उपलब्ध असतील. तथापि,३ वर्ष ते १० वर्षांसाथीचा एफडी व्याजदर ५.७ टक्के राहील.

ज्येष्ठ नागरिकांचे एसबीआय एफडी दर-

>> ७ ते ४५ दिवस – ३.८%

>> ४६ ते १७९ दिवस – ४.८%

>> १८० ते २१० दिवस – ५.३%

>> २११ दिवस ते १ वर्षापर्यंत – ५.३%

>> १ ते २ वर्षे – ६%

>> २ ते ३ वर्षे – ६%

>> ३ ते ५ वर्षे – ६.२%

>> ५ ते १० वर्षे – ६.५%

 

SBI Wecare Deposit योजना-
यासह एसबीआयने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘SBI Wecare Deposit’ योजना आणली आहे. त्याअंतर्गत जर एखादा ज्येष्ठ नागरिक एसबीआयमध्ये फिक्स्ड डिपॉजिट ठेवत असेल तर त्यांना ०.३० टक्के जादा व्याज दिले जाईल. तथापि, बँकेने यासाठी काही अटीदेखील ठेवल्या आहेत.

‘SBI Wecare Deposit’वर जास्त व्याजाचा लाभ फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच देण्यात येईल, ज्यांनी बँकेत एफडी केली आहे ते ५ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी असेल. त्याच वेळी, यासाठीची दुसरी अट अशी आहे की याचा फायदा घेण्यासाठी ३० सप्टेंबर २०२० पूर्वी बँकेत एफडी करावी लागेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment