धक्कादायक! सहा वर्षाच्या वयापासून जन्मदाता बापच करायचा अत्याचार; सुटकेसाठी मुलीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

 

औरंगाबाद – खेळण्या बागडण्याच वय असलेल्या अवघ्या सहाव्या वर्षी जन्मदात्या बापाचीच स्वतःच्या मुलीवर वाईट नजर पडली आणि घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू झाले. तब्बल 11 वर्षे ही नरकयातना भोगल्यावर सुटका व्हावी म्हणून युवती घरातून पळून गेली. पोलिसांनी तिचा शोध घेतला. तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता बाप- लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक आपबिती त्या 17 वर्षीय युवतीने कथन केली. ते ऐकून पोलिसांच्या पाया खालची जमीनच सरकली. यानंतर मुकुंदवाडी व पुंडलीकनागर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता गुन्हा दाखल करून आरोपी नराधम बापाला आज बेड्या ठोकल्या.

 

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, 12 वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेणारी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. पोलिसांनी त्या बेपत्ता मुलीचा शोध घेऊन तिला परभणी जिल्ह्यातून औरंगाबादला आणले. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आणले. त्या मुलीला ठण्यातिल महिला अधिकाऱ्यांनी विश्वासात घेत विचारपूस केली असता. वडीलच अत्याचार करीत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. अवघ्या 6 वर्षाची असताना बापाची वाईटनजर तिच्यावर पडली होती. तेंव्हा पासून जन्मदाता बापच लैंगिक अत्याचार करीत होता. तब्बल 11 वर्षे ही नरकयातना तिने निमूटपणे सहन केली. दीड महिन्यांपूर्वी पुन्हा आरोपी बापाने इच्छे विरुद्ध युवतीवर बलात्कार केला. त्यामुळे ती परभणी जिल्ह्यातील एका मित्राकडे पळून गेली होती, अशी माहिती तिने पोलिसांकडे दिली.

 

याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा नुसार आरोप बापा विरोधात गुन्हदाखल करून अटक केली आहे. हे प्रकरण पुंडलिकनगर पोलिस ठाणे हद्दीतील असल्याने झिरो ने तो वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक भ्रह्मा गिरी यांनी दिली. स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणारी नाराधमाणे सन 2013 मध्ये एका 7 वर्षीय मुलीचे अपहरण केले होते. या गुन्ह्यामध्ये त्याला न्यायालयाने दोषी ठरविले आहे, अशी माहिती तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दिवसेंदिवस औरंगाबाद शहरात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे मात्र पोलीसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Leave a Comment