व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पुणे हादरलं! फिरायला नेतो म्हणत, 4 वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. रोज काही ना काही घटना घडत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच पुण्यातील कोथरूड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका 30 वर्षीय नराधमाने एका ४ वर्षीय बालिकेसोबत अश्लील कृत्य केल्याचा भयानक प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, या 30 वर्षीय आरोपीने एका चार वर्षीय चिमुकलीला आडोशात नेले. यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी ही मुलगी जोरात रडायला लागली तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. यानंतर परिसरातील रहिवाशांनी त्वरित पोलिसांना बोलावून घेऊन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. आता पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु असून राजेश चोरगे असे आरोपीचे नाव आहे.

नक्की काय घडले?

कोथरूड येथे राहणारी चार वर्षांची चिमुकली घरासमोर खेळत होती. ते खेळत असताना आरोपी चोरगे याची नजर तिच्यावर पडली. यानंतर त्याने मुलीजवळ जाऊन तुला फिरायला घेऊन जातो असे सांगितले. असे म्हणून त्याने तिला सोसायटीच्या बाहेर लावलेल्या एका बस जवळ नेले. यावेळी त्याने तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. यामुळे ती रडू लागले आणि हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यानंतर परिसरातील रहिवाशांनी आणि मुलीच्या आजोबांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले.

दरम्यान, सध्या राज्यात गुन्हेगारीच्या प्रमाणासोबत महिलांसोबत होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या भागातून मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र तरीदेखील अशा घटनांना आळा बसवण्यासाठी सरकार योग्यरीत्या प्रयत्न करताना दिसत नाहीये. त्यामुळे पुन्हा राज्यात महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न उभा राहिला आहे.