कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
वसंतगड (ता. कराड) येथील एक महिला कोरोना पॉझिटीव्ह आली असून तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र सून कोरोनाबाधित झाल्याचा धक्का बसल्याने सासऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे गावावर एकच शोककळा पसरली आहे.
गुरूवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये वसंतगड येथे पंधरा दिवसापूर्वी मुंबईहून आलेली एक महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा रिपोर्ट आला. आरोग्य यंत्रणेने रात्री एकच्या सुमारास संबधित महिलेस उपचारासाठी ताब्यात घेतले. तेथून दवाखान्यात दाखल करण्यात येत आहे. तोपर्यंत मध्यरात्री दीडच्या सुमारास संबधित महिलेच्या पंचाहत्र वर्षीय सासऱ्याचा ह्दयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला. सून कोरोनाबाधित निघाल्याने सासऱ्यांचा अत्यंविधी कराड येथे कोविड -१९ नुसार करण्यात आला.
दरम्यान, सदर सून कोणा कोणाच्या संपर्कात आली होती याचा शोध घेतला जात असून सध्या रुग्ण सापडलेला परिसर सील करण्यात आला आहे. काल गुरुवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार सातारा जिल्ह्यातील निकट सहवासित 56 प्रवास करुन आलेले 2, सारी बाधित 10 असे 68 आणि यानंतर रात्री उशिरा आणखी 2 असे एकूण 70 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.