धक्कादायक ! वंशाचा दिवा नाहीतर मुलगी हवी होती यामुळे रागाच्या भरात चिमुकल्याची हत्या

0
116
murder
murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – आपल्या परिवाराला वंशाचा दिवा मिळावा म्हणून लोक उपासतापास, होमहवन करत असतात. एवढेच काय तर अंधश्रद्धेच्या नावाखाली नरबळीसुद्धा देतात. काही ठिकाणी सुनेला मुलगी झाली म्हणून तिच्या सासरकडचे तिला त्रास देत असतात. म्हणून परिवाराला वंशाचा दिवा मिळावा म्हणून लोक वाटेल ते करायला तयार असतात. पण नागपुरात एक वेगळीच घटना समोर आली आहे.

या परिवारातील लोकांना वंशाला दिवा म्हणजेच मुलगा नाहीतर मुलगी पाहिजे आहे. आपल्याला मुलगा नाहीतर मुलगी पाहिजे या अट्टाहासामुळे त्याने मुलाच्या बाबतीत धक्कादायक पाऊल उचलत त्याची हत्या केली आहे.हि घटना नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. आपल्याला मुलगा नाहीतर मुलगी पाहिजे असे त्या पित्याला वाटत होते. “मला मुलगी हवी होती पण मुलगा झाला” यावरून त्याच्यात आणि त्याच्या पत्नीमध्ये मोठा वाद झाला होता.

या वादातून त्याने टोकाचे पाऊल उचलत त्याने एक वर्षाच्या चिमुकल्याची दगडावर आपटून हत्या केली आहे. सत्यम कौरती असे त्या चिमुकल्याचे नाव होते. तर आरोपी वडिलांचे नाव भजन कौरती असे आहे. या प्रकरणात पोलिसांनी भजन कौरती याला अटक केली आहे. नागपूर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here