हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आई होणं हे प्रत्येक स्त्रीच स्वप्न असत.आपल्या बाळासाठी ती प्रत्येक नवीन गोष्टींसाठी तडजोड करत असते. परंतु आज एक भयंकर प्रसंग बुलढाणा येथे घडला आहे. प्रसूती कळा नसतानाही डॉक्टरांनी महिलेची प्रसूती केली त्यात बाळाचा मृत्यू झाला. जगात येण्याच्या अगोदरच त्याच्यावर कोणाच्यातरी चुकीची शिक्षा मिळाली.
जळगाव जिल्ह्यातील जामोद येथे ही घटना घडली आहे. पोलिसात तक्रार करूनही त्या डॉक्टरांवर आणि त्याच्या रुग्णालयावर कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून तक्रारदार व्यक्तीने उपविभागीय कार्यालयातील खांबाला स्वतःला बांधून घेत हँड लॉक उपोषण केले आहे. अखेर या व्यक्तीची दखल प्रशासनाने घेतली असून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील जामोद तालुक्यामधील आसल गाव येथी ल हा राहणार व्यक्ति आहे. त्याची पत्नि शारदा संजय भोंगळे यांची प्रसूती जामोद येथील समाधान हॉस्पिटलमध्ये करण्यात आली होती. डॉ अविनाश पाटील यांनी प्रसूती अगदी क्रूरपणे केली असल्याने इतक्या दिवस असलेले सुदृढ बाळ प्रसूती करतानाच दगावले असा आरोप संजय यांनी केला तसेच या हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शारदा या प्रसूती संदर्भातील उपचार जामोद येथील डॉ महिला उज्वला पाटील यांच्याकडे सुरू होता. उज्वला पाटील या शासकीय सेवेत असून त्या तालुका स्तरावर वैधकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मात्र त्यांचे पती डॉ अविनाश पाटील यांनी महिलेला प्रसूती कळा येत नसतानाही आपल्या क्लिनिक मध्ये नेत जबरदस्ती प्रसूती केली. इतकेच नव्हे तर महिलेच्या पिशवीत हात घालून बाळाची ओढाताण केली . त्यामुळे हे बाळ दगावले असा धक्कादायक प्रकार डॉ अविनाश यांनी केला . अशी माहिती स्वतः पीडित महिला शारदा यांनी सांगितली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.