औरंगाबाद – शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढतच चाललेली आहे. त्यातच अत्याचार आणि बलात्काराच्या घटना दररोज घडत असतात पण ही घटना वेगळी आहे. औरंगाबादेत सख्या भावानेच बहिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलीचे पोट दुखत असल्याने खासगी रुग्णालयात गर्भपात केल्याचे समोर आले.
याविषयी अधिक माहिती अशी कि, औरंगाबाद शहरातील नूर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलीवर ३३वर्षीय सख्या भावाने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीचे पोट दुखत असल्याने खासगी रुग्णालयात गर्भपात केल्याचे समोर आले. यामुळे भाव बहिणीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस अली आहे.
यानंतर बहिणीच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात नराधम भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी आरोपीला ताब्यात घेत जेरबंद केले.