महिलेने पतीसाठी घराचा दरवाजा उघडा ठेवला, शेजाऱ्याने घरात घुसून बलात्कार केला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नोएडा : वृत्तसंस्था – नोएडा या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या पतीसाठी घराचा दरवाजा उघडा ठेवला होता तेव्हा शेजाऱ्याने याचा फायदा उचलत घरात घुसून त्या महिलेवर बलात्कार केला आहे. या महिलेचा पती झोपण्यासाठी छतावर गेला होता. तो रात्री घरात येईल म्हणून महिलेने घराचा दरवाचा उघडा ठेवला होता. मात्र हा दरवाजा उघडा ठेवणे या महिलेला चांगलेच महागात पडले आहे.

या महिलेने घराचा दरवाजा उघडा ठेवल्याचे पाहून शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने छतावरून घरात प्रवेश केला. यानंतर त्याने या महिलेच्या खोलीत घुसून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या आरोपीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने तिच्या घराशेजारी राहत असलेल्या रिंकू नावाच्या व्यक्तीवर बलात्काराचा आरोप केला आहे.

या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रिंकू नावाच्या व्यक्तीने घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेतला. या व्यक्तीने गुपचूप महिलेच्या खोलीत घुसून तिला मारहाण करत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून या व्यक्तीला अटक केली आहे.

Leave a Comment