हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन बिहारमध्ये डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाचं धक्कादायक उदाहरण समोर आलं आहे. 21 वर्षांच्या तरुणीचं ऑपरेशनदरम्यान पोटात टॉवेल राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मीरा देवी नावाच्या महिलेला प्रसूतीच्या त्रासानंतर पोटात दुखायला लागलं. 29 जुलाई रोजी डॉक्टरांनी महिलेचे ऑपरेशन केले. त्यानंतर, वेदना कमी होण्याऐवजी महिलेला जास्त त्रास होऊ लागला.
या महिलेला उपचारासाठी बिहारमधील गया इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सतत त्रास होऊ लागल्यानंतर या महिलेची तपासणी कऱण्यात आली आणि त्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.
कुटुंबियांनी या रुग्णालयातून दुसरीकडे उपचारासाठी हलवण्यात आलं पण तरीही महिलेचा त्रास कमी झाला नाही. अखेर डॉक्टरांनी सीटीस्कॅन करण्याचा निर्णय घेतला आणि रिपोर्ट पाहून त्यांनाही मोठा धक्का बसला. महिलेच्या पोटात एक वस्तू दिसली ही वस्तू पाहून डॉक्टरही हैराण झाले.
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार या तरुणीची प्रसूती करण्यात आली होती. या महिलेला गया शहरातील आनंदी माई मोर जवळील एका खासगी क्लिनिकमध्ये दाखल केले होते. 29 जुलै रोजी डॉक्टरचे ऑपरेशन झाले पण ऑपरेशननंतर महिलेला सतत पोटदुखीचा त्रास झाला होता.
ऑपरेशन दरम्यान टॉवेल महिलेच्या पोटात राहिल्याचं सीटीस्कॅनदरम्यान समोर आलं. त्यानंतर पुन्हा एकदा ऑपरेशन करून या महिलेच्या पोटातून टॉवेल काढण्यात आला आहे. सध्या या महिलेची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळाली आहे. 29 जुलैला ज्या डॉक्टरनं ऑपरेशन केलं त्या डॉक्टरविरोधात कारवाई करण्याच्या तयारीमध्ये आहे.