औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना हरवण्यासाठी लसीकरण सूरु आहे. 18 वर्षावरील लसीकरण सुरू झाले होते तेव्हा प्रचंड प्रमाणात लसीकरणासाठी नागरिकांकडून प्रतिसाद मिळत होता. परंतु कमी लसीचे प्रमाण कमी असल्यामुळे लसीकरण बंद ठेवण्यात आले होते.
आतापर्यंत 18 वर्षांवरील 7 लाख 35 हजार नागरिकांनाच पहिला डोस मिळाला आहे. लसीकरण याच गतीनेच चालले तर 18 वर्षांवरील सर्वांना पहिला डोस देण्यासाठीच किमान दोन वर्षे लागतील. यामध्ये दुसऱ्या डोससाठी सुद्धा वाट बघावी लागत आहे. नागरिक आरोग्य केंद्रावर जाऊन पहाटे पासून दुसरा रोज घेण्यासाठी गर्दी करतात. परंतु त्यांना लस न मिळाल्याने परत जावे लागते. औरंगाबाद जिल्ह्यात रोज 40 हजार नागरिकांना लस देण्याची आरोग्य यंत्रणेची क्षमता आहे. या क्षमतेनुसार नागरिकांना डोस देण्यात आले तर 2 महिन्यांत 18 वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस देऊन पूर्ण होईल. परंतु, औरंगाबादेत लसींचा साठा पुरेसा नसल्यामुळे लसीकरण बंद ठेवण्यात येते. आठवड्यातून फक्त दोन दिवस लसीकरण सुरू ठेवण्याची वेळ आली आहे.
‘कोविड लसीकरणाचे नोडल ऑफिसर डाॅ. महेश लड्डा म्हणाले, प्राप्त होणाऱ्या लसी डोसनुसार लसीकरण होत आहे. कोविशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसानंतर, तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस 28 दिवसांनंतर दिला जात आहे.’‘ग्रामीण भागातील लोकसंख्या जास्त असल्यामुळे लसींचा साठा जास्त लागतो. मनपा एका दिवसात पंधरा हजार नागरिकांचे लसीकरण करू शकते जर्मन पाला 45 हजार लस मिळाली आता तीन दिवस लसीकरण करू शकतात परंतु एवढ्या लसी उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण बंद करण्यात येते. कोरोना झाला तरी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लागण्याचे, प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाण कमी होते.’ असे आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्नील लाळे म्हणाले.
18 वर्षांवरील नागरिकांची संख्या 32,87,814 एवढी आहे. 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. आणि 12 जुलैपर्यंत पहिला डोस 7,35,019 तर 13 जुलैपर्यंत 2,13,731 दुसरा डोस देण्यात आला होता. 18 वर्षांवरील नागरिकांची म्हणजे लसीकरणाच्या लाभार्थ्यांची संख्या ही 32 लाख 87 हजार आहे.