हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. भारतातील आणीबाणीच्या काळावर आधारित असलेल्या या चिंत्रपटात कंगना माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. तर दुसरीकडे आता माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे दिसणार आहे.
श्रेयसने या चित्रपटातील आपला लूक शेअर करत एक कविता सादर केली आहे
बाधाएं आती हैं आएं
घिरें प्रलय की घोर घटाएं,
पावों के नीचे अंगारे,
सिर पर बरसें यदि ज्वालाएं,
निज हाथों में हंसते-हंसते,
आग लगाकर जलना होगा।
कदम मिलाकर चलना होगा। – अटलजी
https://www.instagram.com/p/CggJqDLj5hl/?utm_source=ig_embed&ig_rid=1c19817e-53c1-46ec-9a8c-2d75b6f9525f
‘सर्वात प्रिय, दूरदर्शी, खरे देशभक्त आणि जनतेचा माणूस.. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीजी यांची भूमिका साकारण्याचा सन्मान आणि आनंद मला मिळाला आहे. मला आशा आहे की मी प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेन. गणपती बाप्पा मोरया. अशी पोस्ट श्रेयश तळपदे यांनी शेअर केली. तसेच त्याने कंगना राणावतचे आभारही मानले.कंगना यांनी मला अटलजींच्या रूपात पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही निःसंशयपणे आमच्या देशातील सर्वात प्रतिभावान आणि अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक आहात परंतु तुम्ही तितकेच चांगले दिग्दर्शकही आहात असं म्हणत त्याने कंगनावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
दरम्यान, ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती अभिनेत्री कंगना रनौत स्वतःच करत आहे. श्रेयसच्या या भूमिकेबद्दल कंगनाने एका मुलाखतीत सांगितले कि, ‘श्रीमती इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान झाल्या तेव्हा अटलबिहारी वाजपेयी हे तरुण आणि आघाडीचे नेते होते. ते आणीबाणीच्या नायकांपैकी एक होते. श्रेयस हा एक अष्टपैलू अभिनेता असल्यामुळे त्याला चित्रपटाच्या टीममध्ये सहभागी करून घेणं हे आमचं भाग्य आहे. अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेतील त्याचा अभिनय अविस्मरणीय ठरेल असा विश्वास कंगनाने व्यक्त केला.