पुसेसावळी | पुसेसावळी (ता.खटाव) विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत चंद्रकांत (दादा) कदम आणि सुर्यकांत कदम (बापु) यांच्या नेतृत्वाखालील श्री. हनुमान ग्रामविकास सहकार पॅनेलचे सर्वच्या सर्व 13 जागावर उमेदवार निवडून आले आहेत. तर विरोधी श्री. हनुमान जनशक्ती सहकार पॅनेलचा एकही जागा मिळालेली नाही.
विकास सेवा सोसायटीवर चंद्रकांत पाटील व सुरेश पाटील यांचे अनेक वर्षापासुन एकहाती वर्चस्व असल्याने विरोधी श्री. हनुमान जनशक्ती सहकार पॅनेल कडुन युवा फळीचे संघटन करुन पॅनेल उभे केले. त्यामुळे या अटीतटीच्या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.
तरी या लढतीमध्ये श्री. हनुमान ग्रामविकास सहकार पॅनेलचे दत्तात्रय कदम, युवराज कदम, रविंद्र कदम, संतोष कदम, सुशांत गुरव, दिनकर जाधव, आनंदा माळवे, बाळासो माळवे, शोभा कदम, सुरेखा लवळे, शहाजी माळवे, रामचंद्र पिसे, अशोक कारंडे हे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. तर विरोधी पॅनेलला एकही जागा मिळविता आली नाही.
पुसेसावळी विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये माजी सरपंच सुरेश पाटील, सरपंच दत्तात्रय रुद्रुके, भिमराव मांडवे, बाळासाहेब खोत, सचिन कदम, किरण कदम
संग्राम कदम, अशोक कदम, उदय माळवे, अमृत आळंसुदकर, महादेव माळवे, काका पाटील, शशिकांत खोत, हैबत कदम व सभासदांनी श्री. हनुमान ग्रामविकास सहकार पॅनेलच्या विजयासाठी कष्ट घेतले.
तसेच नवनियुक्त उमेदवार, कार्यकर्ते यांच्याकडून गावातुन विजयी मिरवणुक काढुन फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. यावेळी आैंधचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पुसेसावळीचे पोलीस उपनिरीक्षक गुरुप्रसाद केंद्रे व सहकारी यांचेकडुन चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.