हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एखादी गोष्ट करण्याची जिद्द जर मनाशी ठरवली तर काहीही झालं तरी ती पूर्ण करण्यात कोणीही रोखू शकत नाही. अशीच जिद्द एका आदिवासी समाजातील मुलीने केली आणि ती कठोर परिश्रमाच्या जोरावर तिने UPSC परीक्षा देत IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. पाहूया एका मजूर कुटुंबातील अधिकारी बनलेल्या श्रीधन्या सुरेश हिची यशोगाथा…
केरळच्या संपूर्ण आदिवासी समाजातील पहिल्या महिला आयएएस बनलेल्या श्रीधन्या सुरेश केरळच्या मागास जिल्ह्यात वायनाडच्या 22 वर्षीय कन्या. हिने यूपीएससी 2018 च्या परीक्षेच्या निकालात 410 वा क्रमांक मिळवला आहे. आणि आपल्या आई वडिलांच्या कष्टाचं फळ त्यांना दिले.
आदिवासी समाजातील पहिली मुलगी
केरळ राज्यातील आदिवासी समाजातील एकही मुलगा अथवा मुलगी नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेली नव्हती. आदिवासींमधून ही परीक्षा उत्तीर्ण होणारी श्रीधन्या सुरेश हि पहिली मुलगी ठरली. यामागचे कारण म्हणजे आदिवासी भागात थोड्या लोकांनाच यूपीएससी बद्दल माहिती होती. मात्र, महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या श्रीधन्या सुरेश हिने आपणही अधिकारी होण्याचा निर्णय घेतला.
घरच्या हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण
केरळचा सर्वात मागासलेला जिल्हा वायनाड येथील रहिवाशी असलेल्या श्रीधन्या सुरेश हि कुरीचिया जमातीतील कन्या. तिचे वडील मजूरी करून तसेच गावच्या बाजारात धनुष्यबाण विक्रीचे काम करायचे. तर आई मनरेगा अंतर्गत काम करायची. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत श्रीधन्या व तिच्या तीन भावंडांचे बालपण गेले. कुटुंब खूप गरीब होते, परंतु पालकांनी श्रीधन्या हिच्या शिक्षणाच्या मार्गावर गरिबी येऊ दिली नाही. वायनाडमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर तिने कालीकटयुनिव्हर्सिटी मधून अप्लाइड झूलॉजी मधून मास्टर्स केले.
अशी झाली IAS अधिकारी होण्याची इच्छा
शिक्षण संपल्यानंतर केरळमधील अनुसूचित जमाती विकास विभागात लिपिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. काही काळ वायनाडमधील आदिवासी वसतिगृहांची वॉर्डन म्हणून देखील काम केले. एकदा माझी भेट आयएएस अधिकारी श्रीराम सांबा शिवराव यांच्यासोबत झाली. त्यामुळे माझ्यामध्ये आयएएस अधिकारी बनण्याची इच्छा जागृत झाली असं;असल्याचे श्रीधन्या हिने सांगितले.
मित्रांनी दिली मोलाची साथ
श्रीधन्या हिला महाविद्यालयीन काळापासूनच स्पर्धा परीक्षांची आवड होती. यूपीएससीसाठी प्रथम तिने आदिवासी कल्याण संचलित नागरी सेवा प्रशिक्षण केंद्रात काही दिवस मार्गदर्शन घेतले. त्यानंतर तिरुवनंतपुरममध्ये जाऊन त्या ठिकाणी तयारी केली. यासाठी आदिवासी विभागाने तिला आर्थिक मदत केली. मुख्य परीक्षेसाठी मुख्य विषय म्हणून मल्याळमची निवड केली. मुख्य परीक्षेनंतर जेव्हा श्रीधण्या हिचे नाव मुलाखत यादीमध्ये आले तेव्हा तिला कळले की त्यासाठी तिला दिल्लीला जावे लागेल. त्यावेळी माझ्या कुटुंबाकडे इतके पैसे नव्हते की केरळ ते दिल्ली पर्यंत जाणे मला परवडेल. माझ्या मित्रांना हे कळताच त्यांनी आपापसात देणगी गोळा केली आणि चाळीस हजार रुपयांची व्यवस्था केली, त्यानंतर मला दिल्ली गाठता आली.
प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते
UPSC परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर श्रीधन्या हिने आईला फोन करून ही माहिती दिली. गरीब कुटुंब असल्यामुळे घरची परिस्थिती खूप बिकट होती. अशा गरीब अवस्थेत तिने खूप कष्ट घेत अभ्यास केला. आणि एक अधिकारी होऊन आपल्या घरची परिस्थिती सुधारली. या यशाबद्दल श्रीधण्या म्हणते कि मला नेहमीच वाटते की प्रयत्न करण्याचा आणि सफलता मिळवण्याची जिद्द आपल्याला नक्कीच यशस्वी करू शकते.