खासदार पाटीलांची शेतात मशागत, सगळं बंद असूनही कोणी उपाशीपोटी नाही याचं श्रेय शेतकर्‍यांना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थेमान घातले आहे. कोरोना रोगाच्या साथीमुळे अनेक देशांनी लाॅकडाउन पुकारले आहे. या लाॅकडाउनच्या काळात सर्वत्र बंद असताना कोणीही उपाशीपोटी नाही याचे श्रेय शेतकर्‍यांना द्यावे लागेल असे मत सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले आहे. खासदार पाटीलांनी शेतात मशागत करतानाचा एक फोटो सोशल मिडियावर शेयर करत त्यांनी शेतकर्‍यांच्या योगदानाबाबत भाष्य केले आहे.

भारतातही मागील काही दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. लाॅकडाउनमुळे सर्व मोठ्या कंपन्या, कारखाने बंद असूनदेखील कोणी उपाशीपोटी नाही याचे श्रेय शेतकर्‍यांना द्यावे लागेल असे मत खासदार पाटिल यांनी व्यक्त केले आहे. “एकीकडे वैद्यकीय व पोलीस यंत्रणा कोरोनाशी लढत असताना दुसरी बाजू बळीराजाने आपल्या मजबूत खांद्यावर टिकवून ठेवली आहे. म्हणूनच आपण शेती,माती आणि शेतकरी बंधू भगिनींप्रती कृतज्ञ असायलाच हवं” असं म्हणत पाटील यांनी बळीराजाला शतशः वंदन केले आहे.

तसेच, ‘सध्या देशावर ओढावलेलं कोरोना विषाणूचं संकट मोठं आहे. अशावेळी शेती व शेतकऱ्यांचं महत्त्व अधिक प्रकर्षाने कळतंय. कारखाने, मोठमोठी ऑफीसेस असं सगळं इथून तिथपर्यंत बंद आहे. उद्योजक, कामगार, गरीब, श्रीमंत असे सर्वजण घरातच आहेत. या काळात हा जगाचा पोशींदा आज सर्वांचा खऱ्या अर्थाने तारणहार झालाय. या कठीण काळात देखील आपण उपाशीपोटी नाही याचे श्रेय सर्वस्वी शेतकरी बांधवांचं आहे’ असे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शेतातली माती शेतकऱ्याच्या मनात खोलवर उतरुन सतत संवाद साधत असते. कृषीसंस्कृतीची मुळं आपल्या मनात ही अशी घट्ट खोलवर रुजलेली आहेत, ती यामुळेच. मी शेतातच राहत असल्याने शेताची ही हाक मला सतत कानी येत असते. शेतात दिवसातून एकदा तरी फेरफटका मारल्याशिवाय दिनक्रम पुर्ण होत नाही असं सांगत पाटील यांनी आपले शेतीप्रेम व्यक्त केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in