अनुभवी मिशीवाला उदयन भोसलेंना भारी पडणार का??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सकलेन मुलाणी | मागील महिन्यात भाजप प्रवेशावेळी आपण मिशिवाल्या २ लोकांना घाबरत असल्याचं उदयन भोसले म्हणाले होते. शिवसेनेचे नरेंद्र पाटील आणि भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा उल्लेख त्यांनी केला होता. उदयन भोसलेंना टक्कर देणारा तिसरा मिशिवाला आता लोकसभेच्या आखाड्यात उतरणार आहे. हा मिशिवाला नवखा नसून दांडगा अनुभव असलेला आहे. सातारा लोकसभा पोटणीवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. श्रीनिवास पाटील असं त्यांचं नाव.

सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी उदयन भोसलेंच्या विरुद्ध लढणार आहे. ज्या नेत्याला लोकांनी दिलेल्या मतदारांचा आदर करता येत नाही तो लोकांसाठी काय काम करणार असा टोलाही यावेळी श्रीनिवास पाटील यांनी लगावला. श्रीनिवास पाटील हे सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल असून कराड लोकसभेतून ते खासदारही राहिले आहेत. शरद पवार यांच्या अफाट कार्यक्षमतेचं श्रीनिवास पाटील यांनी कौतुक केलं असून राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्याचं काम पवार या वयातही करत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कराड उत्तर, कोरेगाव, कराड दक्षिण सोबतच खंडाळा, पाटण आणि सातारा या भागातील लोकांचाही चांगला संपर्क असल्याने आपल्याला मतांचं गणित जुळवताना अवघड जाणार नसल्याचं श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादीने उदयन भोसलेंना जी संधी दिली होती, त्याचं त्यांनी सोनं करायला हवं होतं. पण नवीन घरोबा केल्यामुळे त्यांचं नुकसानच झालं असल्याचं श्रीनिवास पाटील म्हणाले.

काय म्हणतायत श्रीनिवास पाटील – अधिक पाहण्यासाठी