हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2021 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत श्रुती शर्मा या युवतीने प्रथम मिळवला आहे. परीक्षेत एकूण 685 उमेदवार यशस्वी झाले आहेत. तर यंदाच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे.
उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील राहणाऱ्या श्रुती शर्माने परीक्षेत यश प्राप्त करत भारतात पहिले स्थान मिळवले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अकिंता अग्रवाल व तिसऱ्या क्रमांकावर गामिनी सिंगला आहे. श्रुती ही सेंट स्टीफन्स कॉलेज आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आहे. तसेच ती जामिया मिलिया इस्लामिया या कोचिंग क्लासेसमधून नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होती.
UPSC declares 2021 Civil Services Exam results
Shruti Sharma, Ankita Agarwal and Gamini Singla secure top three ranks, respectively pic.twitter.com/b0x9N0IomU
— ANI (@ANI) May 30, 2022
UPSC CSE प्राथमिक परीक्षा ही 10 ऑक्टोबर 2021 रोजी झाली होती. तिचा निकाल 29 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला. तर मुख्य परीक्षा ही 7 ते 16 जानेवारी 2022 या कालावधीत घेण्यात आली आणि त्याचा निकाल हा 17 मार्च 2022 रोजी घोषित केला गेला. तसेच, 5 एप्रिलपासून सुरू झालेल्या या परिक्षेचा 26 मे रोजी संपलेल्या परीक्षेच्या मुलाखतीची ही शेवटची फेरी होती. त्यात श्रुती शर्मा हिने बाजी मारली आहे.