हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील पराभूत उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज अधिकृतपणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. शेवटपर्यंत आपण शिवसेनेसोबत राहणार असून शिवसेनेसाठी आपण लढणार आहोत, खरी लढाई तर आता सुरु झालीये अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
शुभांगी पाटील म्हणाल्या, मी यापूर्वीच सांगितलं होत कि निवडणूक निकालानंतर मी मातोश्रीवर जाणार आहे. मी शब्दला पक्की आहे. आज मी मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेतले आणि शिवबंधन बांधलं आहे. उद्धव ठाकरे मला जी जबाबदारी मला देतील ती मी नक्कीच पूर्ण करेन आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी शिवसेनेबरोबर काम करत लढत राहील असं त्यांनी म्हंटल. मी उत्तर महाराष्ट्र तर पिंजून काढेनच पण याशिवाय संपूर्ण महाराष्ट्र्रातील शिवसैनिकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करेन असं शुभांगी पाटील यांनी म्हंटल.
कसबा पेठ, पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर
'या' 2 नेत्यांना संधी👉🏽 https://t.co/y068weB0nk#Hellomaharashtra @BJP4Maharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) February 4, 2023
नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने माझंच काम केलं होते. वंचित बहुजन आघाडीची सुद्धा मला साथ होती असं त्यांनी म्हंटल. नाना पटोले, शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे यांनी मला भरपूर साथ दिली होती. आणि नाना पटोले यांनी तर माझ्या डोक्यावर हात ठेऊन तू विजयी आहेस, चालत राहा असं म्हंटल होत. जनतेने मला किती प्रेम आणि आशीर्वाद दिले हे सर्वानी बघितलं आहे असेही शुभांगी पाटील म्हणाल्या.