मुंबई- प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आलं नसून यासंबंधी पोलीस तपास करत आहेत. रिपोर्टनुसार, काल रात्री सुशांतचे काही मित्र त्याच्या घरी होते. आज सकाळी बराचवेळ सुशांतने घरचा दरवाजा उघडला नाही म्हणून त्याच्या घरी काम करणाऱ्या नोकराने दरवाजा तोडला. यावेळी सुशांतचा देह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. हाती मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता.त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक टीव्ही अभिनेता म्हणून केली.
Mumbai: Body of actor #SushantSinghRajput brought to Dr RN Cooper Municipal General Hospital from his residence in Bandra. The actor committed suicide at his residence today. pic.twitter.com/JXoKXfdX5A
— ANI (@ANI) June 14, 2020
सुशांतने ‘किस देश में है मेरा दिल’ मालिकेत पहिल्यांदा काम केलं. मात्र त्याला खरी ओळख एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून मिळाली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. काय पो छे हा सुशांतचा पहिला सिनेमा होता. पहिल्याच सिनेमातील अभिनयाबद्दल त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं होतं.
यानंतर सुशांतने परिणीती चोप्रासोबत शुद्ध देसी रोमांस सिनेमात काम केलं. पण त्याच्या नावाची सर्वात जास्त चर्चा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी या सिनेमातून झाली. हा सुशांतच्या करिअरमधला पहिला सिनेमा होता ज्याने १०० कोटींपेक्षा जास्तची कमाई केली होती. सोनचिडिया आणि छिछोरे या सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे. सारा अली खानसोबतच्या केदारनाथ सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.