हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकात काँग्रेसने एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर आज शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी सिद्धारमैया यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर डिके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी देशभरातील प्रमुख विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते.
आज सकाळपासूनचा या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु होती. दुपारी 12.30 वाजता राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धारमैया याना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. तसेच डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या दोन्ही नेत्यांव्यतिरिक्त डॉ जी परमेश्वरा, केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज आणि एमबी पाटील यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. सतीश जारकीहोळी, प्रियांक खर्गे (मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा), रामलिंगा रेड्डी आणि जमीर अहमद खान यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
Newly-elected Karnataka government of eight ministers, led by CM Siddaramaiah with DK Shivakumar as his Deputy, took oath in Bengaluru today. pic.twitter.com/3oYrHpMtpO
— ANI (@ANI) May 20, 2023
या भव्य दिव्य शपथविधीला देशभरातील ९ विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. यामध्ये शरद पवार (NCP), फारूख अब्दुल्ला (राष्ट्रीय कॉन्फेरेंस), कमल हसन (मक्कल निधि मैयम), (. नितीश कुमार (JDU ), तेजस्वी यादव (RJD ), डी राजा आणि सीताराम येचुरी (LEFT), एमके स्टॅलिन (DMK ) या नेत्यांचा समावेश होता. तसेच काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियांका गांधी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे नेते कमलनाथ आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे सुद्धा उपस्थित होते.