कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धारमैया? डी के शिवकुमार यांनीच दिले संकेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सत्ताधारी भाजपला धोबीपछाड देत सत्ता काबीज केली. कर्नाटकात ज्या २ नेत्यांनी जीवाचे रान करून काँग्रेसची सत्ता आणली त्या डिके शिवकुमार आणि सिद्धारमैया यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी चुरस असेल. या दोघांपैकी नक्क्की कोणाला मुख्यमंत्री करायचा असा मोठा प्रश्न काँग्रेस हायकमांड पुढे असेल. तत्पूर्वी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धारमैया यांचीच वर्णी लागण्याची चिन्हे आहेत. डिके शिवकुमार यांनी स्वतः त्याबाबत एक मोठं विधान केलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना डिके शिवकुमार म्हणाले, काही लोक म्हणतात की माझे सिद्धरामय्या यांच्याशी मतभेद आहेत पण मला हे स्पष्ट करायचे आहे की आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. मी पक्षासाठी अनेक त्याग केले आहेत आणि सिद्धरामय्या यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. मी सिद्धरामय्या यांना पाठिंबा दिला आहे असं डिके शिवकुमार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकीय चर्चाना उधाण आलं आहे.

दरम्यान, कर्नाटकात भाजपला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. अंतिम निकालानुसार, कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागांपैकी काँग्रेसला 135 जागांवर विजय मिळाला आहे तर भाजपला अवघ्या ६५ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. कर्नाटकातील सत्ता गेल्यानंतर आता दक्षिण भारतातून भाजप हद्दपार झाला आहे. मोदी शहा यांनी कर्नाटकात तळ ठोकून, प्रचारसभा घेऊन आणि रॅली काढूनही कर्नाटकातील जनतेने भाजपला स्पष्टपणे नाकारलं आहे. आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या दृष्टीने भाजपसाठी हि धोक्याची घंटा मानली जात आहे.