हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला याची हत्त्या करण्यात आली. या हत्येनंतर पोलिसांकडून त्यांच्या आरोपींचा शोध घेतला जात होता. दरम्यान या हत्या प्रकरणाचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आले आहे. पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात 29 मे 2022 रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये मुसेवालांचा मृत्यू झाला. मुसेवालांवर गोळ्या झाडणाऱ्या आठ जणांपैकी दोघे जण पुण्याचे असून मुसेवालांवर हल्ला करण्यासाठी आठ शार्प शूटर नेमकण्यात आले होते. त्यापैकी दोघे पुण्याचे असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना अटक केली आहे.
पंजाब पोलिसांच्या तपासामध्ये अटक केलेल्या संशयित आरोपींमध्ये पुण्यातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांचा समावेश आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, मुसेवालांच्या हत्येसाठी एकूण आठ जणांना सुपारी देण्यात आलेली होती. यापैकी तिघेजण पंजाबमधील तर अन्य पाच जणांना महाराष्ट्र आणि राजस्थानमधून बोलवण्यात आलेले होते. यातील दोघांना पंजाब पोलिसांनी पुण्यातून आज सकाळच्या सुमारास अटक केली.
मुसेवालाच्या हत्येसाठी एएन-94 ही रशियन बनावटीची असॉल्ट रायफल वापरण्यात आली. सिद्धू मुसेवाला यांच्यावर 2 मिनिटांमध्ये 30 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन एन-94 रायफलच्या गोळ्या सापडल्या होत्या.