चीनमध्ये आणखी एका उद्योजकावर कायद्याचा बडगा! PUBG तयार करणार्‍या कंपनीच्या Pony Ma विरोधात कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांच्यानंतर आता चीनचे कम्युनिस्ट सरकार आणखी एका मोठ्या उद्योजकांवर कायद्याची कडक कारवाई करीत आहे.आता ऑनलाईन गेम पबजी (PUBG) आणि ऑनर ऑफ किंग (Honour of King) डिझाईन करणारी कंपनी टेनसेंट होल्डिंग्स (Tencent Holdings) चा संस्थापक मा हुआतेंग उर्फ पोनी मा (Pony Ma) यांच्यावरही चीनी एंटी-ट्रस्ट कायद्याचा बडगा (China Anti-Trust Law) उगारला जाणार आहे. जॅक मा यांना मागे टाकूनपोनी मा हे नुकतेच चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले.

टेनसेंटच्या मूल्यांकनात दोन लाख कोटी रुपयांची घट

या महिन्यात चिनी अँटी ट्रस्ट वॉचडॉगच्या अधिकाऱ्यांनी पोनी मा यांची भेट घेतली आहे आणि कंपनीला कायद्यानुसार काम करण्यास सांगितले आहे. तसेच कंपनीला नव्या कायद्यानुसार आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करण्यास सांगण्यात आले आहे. पोनी मा यांची भेट घेणे आणि कित्येक तासांच्या चोकशीवरुन हे स्पष्ट झाले की,आता टेनसेंटवरही अँटी ट्रस्ट कायदा उगारला जाणार आहे. त्याची सुरुवात गेल्या वर्षी जॅक मा यांची कंपनी अँट ग्रुप (Ant Group) आणि अलिबाबा ग्रुपपासून झाली होती. या तपासणीच्या भीतीमुळे, टेनसेंटचे मूल्यांकन जानेवारी 2021 पासून सुमारे 2 लाख कोटी रूपयांनी (170 अब्ज डॉलर्स) घटले आहे.

एंटी-ट्रस्‍ट कायद्याने मक्तेदारी संपविली

टेनसेंटची मार्केटकॅप सध्या 56.30 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त (776 अब्ज डॉलर्स) आहे. इंटरनेट कंपन्यांची मक्तेदारी संपवण्यासाठी चीन सरकारने हा कायदा आणला आहे. चीनी सरकारचे म्हणणे आहे की,” या मोठ्या इंटरनेट कंपन्या आपल्या मक्तेदारीच्या आधारे बाजारात त्यांची स्पर्धा संपवत आहेत आणि ग्राहकांच्या डेटाचा गैरवापर करीत आहेत. त्याच वेळी, ते ग्राहकांच्या हितासाठी देखील खेळत आहेत.” डिसेंबर 2020 च्या तिमाहीत टेनसेंटने निव्वळ नफ्यात 175 टक्के वाढ नोंदविली. कंपनीचा निव्वळ नफा 66,000 कोटींपेक्षा जास्त (59.3 अरब युआन) होता.

डिसेंबर तिमाहीत विक्रीत 26% वाढ नोंदली गेली

डिसेंबर 2020 च्या तिमाहीत गेम डिझायनिंग कंपनीच्या निव्वळ विक्रीत 26 टक्क्यांनी वाढ झाली असून त्यामुळे कंपनीचा महसूल 14.88 लाख कोटी रुपये झाला आहे. (133.67 अब्ज युआन). त्याचबरोबर कंपनीच्या ऑनलाइन गेम्सचा महसूल 29 टक्क्यांनी वाढून 45,500 कोटी रुपयांहून अधिक (39.1 अब्ज युआन) झाला आहे. पोनी मा ची कंपनी चीनमधील सर्वात मोठी इंटरनेट कंपन्यांपैकी एक आहे. सोशल मीडिया ऍप व्ही चॅटचा निर्माता टेनसेंट ऑनलाइन व्हिडीओ गेम्स, लाइव्ह स्ट्रीमिंग, न्यूज, म्युझिक आणि साहित्याच्या डिजिटल निर्मितीमध्येही काम करतो.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment