हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सोन्याचा दरात आज वाढ झाली आहे. आज 8 मार्च 2022रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत 0.3% वाढ झाली असून 10 ग्रॅम सोन्याची किंमत 53,532 रुपये झाली. तर दुसरीकडे चांदीच्या भावात देखील 0.38 टक्क्यांनी वाढ झाली असून 70,235 रुपये किलोवर पोहोचले.
10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 49,400 तर 10 ग्राम 24 कॅरेट सोन्याची किंमत 53,890 रुपये आहे. रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोने चांदी दरात लक्षणीय दरवाढ पाहायला मिळत आहे तसेच उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न नुसार सोन्याचे आजचे भाव
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,480 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,950रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव -49,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,890 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 49,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 53,940 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. Gold Rate Today आपल्याला हे माहिती हवे कि 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यास नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.