हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Silver Price : सध्या बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे. अशातच जगभरात महागाई देखील वाढते आहे. ज्यामुळे अमेरिका आणि भारतासह अनेक देशांच्या केंद्रीय बँकांनी व्याजदरात वाढ करण्या बरोबरच आपल्या आर्थिक धोरणात अनेक बदलही केले आहेत. व्याजदरातील वाढीचा इक्विटी आणि बाँड्स सारख्या मालमत्तेवर नकारात्मक परिणाम झाला आहे. तसेच भविष्यात केंद्रीय बँकांचे व्याजदरही आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.
या वाढत्या व्याजदरामुळे 2022 मध्ये S&P 500 इंडेक्स आतापर्यंत 19 टक्क्यांनी घसरला आहे. त्याचप्रमाणे, यूएस बाँड यील्ड रेट देखील 3 टक्क्यांहून जास्त झाला आहे. जर सोन्यावर नजर टाकली तर 2022 मध्ये इतर मालमत्तेच्या तुलनेत त्यामध्ये घट झाली आहे. सोने आतापर्यंत 5 टक्क्यांनी घसरले आहे. हे लक्षात घ्या कि, वाढत्या व्याजदराचा इतर मालमत्तेवर जितका परिणाम होत आहे तितका सोन्याच्या दरावर होत नाही. Silver Price
चांदीमध्ये गुंतवणूक करावी का ???
एका मीडिया रिपोर्ट नुसार, गुंतवणूकदार सोन्यापेक्षा चांदीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगून होते. मात्र, 2022 मध्ये आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किंमती 17 टक्क्यांनी घसरल्या. सध्या मंदीच्या शक्यतांमुळे चांदी आणि तांब्याची संस्थात्मक मागणी कमकुवत झाली आहे. कमोडिटी एक्स्चेंजवर जून 2019 पासून चांदीमध्ये मंदीचे वातावरण आहे. 5 जुलैपर्यंत अनेक गुंतवणूकदारांकडून निव्वळ विक्री झाली. Silver Price
चांदीची कमकुवत कामगिरी
सध्या डॉलरच्या तुलनेत रुपया सातत्याने खाली येतो आहे. 2022 मध्ये आतापर्यंत त्यात 6 टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, रुपयाच्या घसरणीनंतरही चांगला नफा मिळवून देण्याच्या बाबतीत चांदी अजूनही सोन्यापेक्षा मागे आहे. 2022 मध्ये चांदीने 9 टक्के निगेटिव्ह रिटर्न दिला आहे. जुलै 2021 पासून ती आतापर्यंत 18 टक्क्यांनी घसरली तर सोन्याने 2022 मध्ये 5 टक्के रिटर्न दिला आहे. जुलै 2021 पासून आतापर्यंत सोन्याच्या किंमती 6 टक्क्यांनी वाढल्या आहेत. Silver Price
चांदीने दिला 268% रिटर्न
जानेवारी 2000 पासून चांदीने सुमारे 268 टक्के इतका रिटर्न दिला आहे. तर याच कालावधीत सोन्याने जवळपास 521 टक्के इतका रिटर्न दिला आहे. इंडस्ट्रियल कमोडिटी मानल्या जाणाऱ्या तांब्याने या कालावधीत 311 टक्के रिटर्न दिला आहे. अशा प्रकारे चांदी आणि तांब्याचा रिटर्न अगदी जवळ आहे. यावरून त्यांचे औद्योगिक महत्त्व दिसून येते, मात्र तरीच देखील चांदीला सोन्यासारखी कामगिरी करता आलेली नाही. Silver Price
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goodreturns.in/silver-rates/
हे पण वाचा :
Multibagger Stock : अदानी ग्रुपच्या ‘या’ शेअर्सने गाठला सर्वकालीन उच्चांक !!!
रेशनकार्ड असणाऱ्यांना सरकार 3 गॅस सिलिंडर मोफत देणार; पहा काय आहे पात्रता ?
Bank FD : ‘या’ तीन बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळत आहे जास्त व्याज !!!
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात झाला मोठा बदल, नवीन दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात नरमाई, आजचे दर पहा