हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधी कोरोना आणि नंतर मन्कीपॉक्सने जगभरात थैमान घातले आहे. आता तर कोरोना, मंकीपॉक्स आणि एचआयव्ही असे तीनही संसर्ग एकाच वेळी झाल्याचा जगातील पहिला रुग्ण इटली येथे सापडला आहे. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
सदर व्यक्ती 36 वर्षांचा असून पाच दिवसांच्या सहलीनंतर नुकताच स्पेनहून परतला आहे. स्पेनला असतानाच त्याला संक्रमण झालं होत. द सनच्या वृत्तानुसार, 16 ते 20 जूनपर्यंत हा रुग्ण स्पेनमध्ये होता. डोकेदुखी, घशात खवखवणे, ताप या तीन लक्षणांमुळे त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. याच वेळी त्याच्या हातांवर, चेहऱ्यावर आणि पायांवर पुळ्या येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 5 जुलैला त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रिझल्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर गुप्च रोगांच्या चाचण्याही करण्यात आल्या. त्यात रुग्ण एचआयव्ही संक्रमित असल्याचेही स्पष्ट झाले.
11 जुलैपर्यंत या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आणि त्यांच्या अंगावरील मंकीपॉक्सच्या पुळ्याही सुकल्या. त्यामुळे त्याला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे तसेच काही दिवस विलगीकरणात राहायच्या सूचना दिल्या आहेत. मात्र या घटनेने एकाच व्यक्तीला मंकीपॉक्स, कोरोना आणि एचआयव्हीची लागण देखील होऊ शकते हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.