हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। करोनाची लागण झालेली गायिका कनिका कपूरचा सहावा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने याबाबत वृत्त दिलं. दर ४८ तासांनी करोनाबाधित रुग्णाची चाचणी करण्यात येते. याआधी 5 वेळा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, आज तिचा सहावा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र कनिकाला अजूनही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला नाही.
कनिकाची अजून एकदा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. पुन्हा एकदा तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास तिला डिस्चार्ज देण्यात येईल. सध्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGIMS) याठिकाणी तिच्यावर उपचार सुरू आहेत. १६ मार्च रोजी कनिकामध्ये करोना व्हायरसची लक्षणे दिसून येऊ लागली होती आणि २० मार्च रोजी तिचा पहिला करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
कनिकाला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय होती. करोनाची लागण झाल्यानंतरही ती लखनऊमध्ये डिनर पार्टीला गेली होती. यानंतर प्रशासनाने तातडीनं पाऊल उचलत कनिकाच्या संपर्कात आलेल्या जवळपास २५० ते ३०० लोकांचा नंतर शोध घेण्यात आला होता. यात राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे सिंदिया आणि त्यांचे पुत्र खासदार दुष्यंत सिंग यांचा सुद्धा समावेश होता. सुदैवाने त्यापैकी कोणाला अद्याप करोनाची लागण झालेली नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”