कोरोनाचा उद्रेक! देशात मागील २४ तासात ८३ हजार ३४१ नवे रुग्ण आढळले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतात कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं अनासन दिवसेंदिवस परिस्थिती अजून गंभीर बनली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जरी केलेल्या आकडेवारीनुसार मागील २४ तासांत देशात ८३ हजार ३४१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १०९६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

यासोबत देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या ३९ लाख ३६ हजार ७४८ इतकी झाली आहे. सध्या देशात ८ लाख ३१ हजार १२४ अॅक्टिव्ह केसेस असून ३० लाख ३७ हजार १५२ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत ६८ हजार ४७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या रुग्णवाढीने देशासह राज्यात गुरुवारी नवा उच्चांक नोंदवला. देशात दिवसभरात आढळलेल्या एकूण ८३ हजार ८८३ नव्या रुग्णांपैकी राज्यात १८,१०५ नव्या रुग्णांची भर पडली. महाराष्ट्रातही बाधितांची संख्या वाढतच आहे. राज्यात रुग्णवाढीबरोबरच मृतांची संख्याही वाढत आहे. नागपूर आणि पुणे या दोन शहरांमध्ये रुग्णसंख्येचा आलेख वाढत चालला आहे. राज्यात दिवसभरात १३ हजार ९८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८ लाख ४३ हजार झाली असून, २५,५८६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा अधिक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

Leave a Comment